पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भौतिकशास्त्र, उष्णता, वीज आणि चुंबकत्व, गणित, सुतारकाम आणि चित्रकला हे प्राथमिक विषय शिकवले जात. हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकांमध्ये नोकऱ्या मिळत असत. तसेच हे विद्यार्थी स्वतंत्रपणे अभियंते आणि कंत्राटदार म्हणून काम करू शकत.
 व्यापारविषयक तंत्रज्ञान शाखेमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकवला जात असे. यामध्ये व्यावसायिक लेखाजोखा, बँकिंग, चलन, व्यवसायाचे व्यवस्थापन, व्यापाराचा इतिहास, व्यापारी भूगोल, व्यापारी कायदे, प्राथमिक अर्थशास्त्र व टंकलेखन याचा समावेश होता. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार विविध व्यवसायांमध्ये काम करत. कलाभवन

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / १२