पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बँकेला संपूर्ण वित्तपुरवठा करण्याची तयारी पेटलाड येथील भाईशेठ ईश्वरदास यांनी दर्शवली. तर या करारात समाविष्ट करण्यात आलेल्या १४ व्या कलमानुसार बँक ऑफ बडोदाने केल्यावर त्याअगोदर कार्यरत असलेली बडोदा व्यवहार चालू पेढी बंद करण्याचे मान्य करण्यात आले.
 १९ ऑगस्ट १९०७ रोजी बँकेचे प्रवर्तक आणि बडोद्यातील सावकार यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला अहमदाबादचे शेठ चिमणादास नागिनदास, मगनभाई हरिभक्तीवाला, शेठ चिमणलाल मोतीलाल, शेठ मोतीलाल गोर्धन, दाभोईचे शेठ हिम्मतलाल हरगोविंद, लीलाभाई झवेरी व अन्य सावकार उपस्थित होते. या बैठकीत बँक स्थापनेसाठी प्रमुख धनवंतांनी ८ लाख रु. व बडोदा सरकारने १० किंवा १२ लाख रु. भांडवल गुंतवावे असा प्रस्ताव शेठ हरिभक्ती यांनी मांडला. अखेर सरकारने ४% व्याजाने १० लाख रु.चे भांडवल बँकेत गुंतवावे अशी विनंती महाराजांना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या टप्प्यावर सयाजीरावांनी बँकेचे प्रवर्तक आणि सावकारांनी संयुक्तपणे मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली. याचवेळी स्थानिक प्रवर्तक आणि बडोदा सरकार या दोन्ही घटकांना ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असल्याचे जाणवले. संस्थानाबाहेरील कार्यक्षमता या बँकेशी जोडून घेण्याचा उद्देश यापाठीमागे होता.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २५