Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १) बँकेला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी बडोदा सरकारने आपले सर्व व्यवहार बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून करून बँकेच्या सर्वांत मोठ्या ग्राहकाची भूमिका पार पाडावी.
 २) बँकेच्या परस्पर स्वतःहून कोणत्याही ससं ्थेला कर्ज देणार नसल्याची हमी बडोदा सरकारने द्यावी.
 ३) बँकेच्या भागभांडवलाच्या २५ % इतकी बिनव्याजी रक्कम गुंतवून सरकारने बँकेला आर्थिक ताकद द्यावी. याचवेळी ३ लाख रु.पेक्षा जास्त रक्कम न गुंतवण्याची सरकारची अट या तज्ज्ञांनी मान्य के ली.
 ४) बँकेतील शासकीय खात्यांचे लेखापरीक्षण सरकारी खर्चाने करण्यात यावे.
 ५) सरकारच्या वतीने बँकेने करावयाच्या व्यवहारांसाठी स्वतंत्र चालू खाते काढण्यात यावे. या खात्यावरील व्यवहारांसाठी बँक सरकारला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. याउलट सरकारने खात्यातील रकमेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्या रकमेवर कर्जाप्रमाणे तत्कालीन दराने व्याज आकारणी करण्यात यावी.
 व्हाईटनॅक यांनी मोठ्या खुशीने या मागण्या मान्य के ल्या. अखेर हरिभक्ती यांनी बडोद्यातील अन्य नामांकित व्यक्तींसोबत या करारावर सही के ली. बँक स्थापनेच्या विचाराने हर्षोल्लसित झालेल्या तज्ज्ञांनी तिच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. वेळप्रसगं ी गरज पडल्यास

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / 24