Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुंबई येथील सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी व सर लल्लुभाई श्यामलदास आणि अहमदाबाद येथील अंबालाल साकेरलाल देसाई व चिमणाबाई नागीनदास यांना बँक उभारणीच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या चारही व्यक्ती गुजराती होत्या. देशभक्त विचारांच्या या व्यक्ती सयाजीराव महाराजांच्या खास संपर्कातल्या होत्या. संस्थानाचे हित सांभाळतानाच आर्थिक राष्ट्रवादाची भावना जनतेत रुजवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या कर्तव्यकठोर कार्यपद्धतीमुळे थोड्याच कालावधीत त्यांनी बडोद्यातील सावकारांची जागा घेतली. त्यानंतर बँक ऑफ बडोदाच्या वाटचालीत चारही व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 बँक ऑफ बडोदाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी सयाजीरावांनी विठ्ठलदास ठाकरसी, लल्लुभाई श्यामलदास आणि व्हाईटनॅक यांच्या तीन सदस्यीय समितीची नेमणूक केली. बडोद्यातील अनेक बँक व्यावसायिकांनी बँकेचे समर्थन करणारे अनेक अभिप्राय समितीकडे नोंदवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यादरम्यान समितीने आश्चर्यकारकपणे घेतलेल्या नवीन भूमिकेमुळे नवीन वाद निर्माण झाला. या त्रिसदस्यीय समितीने बँकेतील सरकारची ठेव २,५०,००० रु. इतकी मर्यादित करण्याची भूमिका घेतली. यावर १४ सप्टेंबर १९०७ रोजी आपली भूमिका मांडताना शेठ हरिभक्ती लिहितात, “जर बडोदा

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २६