पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्था उदयाला आल्या. १८८७ ला सयाजीरावांनी पहिला परदेश प्रवास केला. परदेशात त्यांनी विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करणाऱ्या संस्था पाहिल्या. जगप्रवासातून महाराजांनी सुंदर कल्पना, धोरणे, संस्था इ. भारतात आणल्या. हे करत असताना महाराजांनी पाश्त्यांची नक्कल केली नाही तर भारतीय पर्यावरणात आपल्यातील सत्वशील परंपरा या नव्या विचाराशी जोडून या नव्या ज्ञानाला 'देशी' आत्मा दिला. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातसुद्धा हिंदू, जैन, बौद्ध या आपल्या प्राचीन धर्म आणि संस्कृतीतील हस्तलिखितांचा अनमोल ठेवा जपणे आणि त्याच्या अभ्यासाला गती देणे या भूमिकेतून अगदी १८९३ पासून प्रयत्न सुरू केले. त्यांच्या समकालीन इतर राजांशी 'तुलना करता काही किरकोळ अपवाद वगळता प्राच्यविद्या संवर्धनात सयाजीरावांएवढे मूलभूत काम दुसऱ्या कोणत्याही राजाने केलेले नाही.
भारतातील प्रमुख प्राच्यविद्या संस्था

 बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या कामाचा आढावा घेत असताना आधुनिक भारतातील प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील काम समजून घेणे आवश्यक ठरते. कारण आपल्याकडे आजही प्राच्यविद्या हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याबरोबरच बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या कामाचे वेगळेपण समजून घेत असताना ते भारतील इतर प्राच्यविद्या संस्थांच्या कामाशी 'तुलना करून समजून घेतले तर त्याचे वेगळेपण आणि महत्त्व अधिक

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ७