पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजा सयाजीराव
आणि
प्राच्यविद्या

 आपल्या समाजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मनुष्याला प्राचीन ग्रंथ व हस्तलिखिते मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतात. या प्राचीन ग्रंथ व हस्तलिखितांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा ‘प्राच्यविद्या' (Oriental studies) म्हणून ओळखली जाते. प्राच्यविद्येमध्ये भारतीय तसेच अन्य पौर्वात्य राष्ट्रांच्या संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान यांच्या अध्ययनाचा व संशोधनाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. वैदिक धर्माव्यतिरिक्त जैन, बौद्ध, इस्लाम इ. धर्मांचा आणि संस्कृत व्यतिरिक्त पाली, प्राकृत व अन्य प्रादेशिक भाषांच्या अध्ययन व संशोधनाचाही प्राच्यविद्येमध्ये समावेश होतो. १८ व्या शतकात युरोपातील प्रबोधन युगात या ज्ञानशाखेचा प्रामुख्याने विकास झाला.

 आधुनिक भारतात सर विल्यम जोन्स या ब्रिटिश अभ्यासकाने प्राच्यविद्येच्या अभ्यासाला संस्थात्मक रूप दिले. याच कालखंडात पाश्चात्य अभ्यासकांबरोबर भारतीय अभ्यासकांची पहिली पिढी तयार झाली. भारतात विविध ठिकाणी प्राच्यविद्या

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ६