पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद
 प्राच्यविद्येच्या प्रसारासाठी १९१९ मध्ये पुणे येथे पहिली अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद आयोजित करण्यात आली होती. आजपर्यंत अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची ५० अधिवेशने भारताच्या विविध प्रांतात संपन्न झाली आहेत. भारतीय प्राच्यविद्येला बडोद्याने दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणजे २७ डिसेंबर १९३३ ची सातवी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद बडोद्यात आयोजित करण्यात आली. ही परिषद सर्वाधिक यशस्वी ठरली. बडोद्यातील या परिषदेचा १,४०० पानाचा कार्य अहवाल १९३५ मध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला. ही परिषद भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या इतिहासातील अत्यंत यशस्वी परिषद मानली जाते. कारण भारताबरोबरच जगभरातून ३८७ प्राच्यविद्यापंडित या परिषदेला हजर होते. या परिषदेत २५० शोधनिबंध सादर करण्यात आले. अगोदरच्या ६ अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेतील सहभागाचा विक्रम मोडणारे हे आकडे आहेत.

 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाराजांनी केलेले भाषण महाराजांची याबाबतची भूमिका आणि दृष्टी व्यक्त करते. महाराज म्हणतात, “काही नाही तरी १८ वर्षांपूर्वीच म्हणजे सन १९१५ मध्ये मी आमच्या शास्त्री पंडितांना सांगितले की, तुम्ही पाश्चिमात्य विद्वानांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, आपले

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २४