इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासाला मूळ साधने उपलब्ध करून देणे. ५) भाषांतर शाखेच्या माध्यमातून सर्व विषयातील प्रमाणभूत ग्रंथ अनुवादित करून वेगाने बदलणाऱ्या आधुनिक जगात आपल्या देशाला योग्य स्थान मिळवून देणे. इ.
मध्यवर्ती वाचनालयातील संस्कृत विभागाचे प्रमुख चिमणलाल दलाल यांना प्राच्यविद्या संस्थेचे प्रथम संचालक होण्याचा बहुमान मिळाला. पुढे ही जबाबदारी बिनोयतोष भट्टाचार्य यांच्याकडे सोपविण्यात आली. महाराजांनी भट्टाचार्यांना ज्या उद्देशाने प्राच्यविद्या संस्थेची जबाबदारी दिली होती तो उद्देश भट्टाचार्यांनी परिपूर्ण साध्य केला.
बिनोयतोष भट्टाचार्य
हे बौद्ध धर्मातील तंत्र संप्रदायावरील अधिकारी पंडित म्हणून जगविख्यात आहेत. १९२४ मध्ये सयाजीरावांनी त्यांना प्राच्यविद्या संस्थेच्या गायकवाड ओरिएंटल सिरिजचे संपादक म्हणून बडोद्यात आणले. १९२७ ला त्यांना प्राच्यविद्या संस्थेचे संचालक केले आणि १९५२ ला ते या पदावरून निवृत्त झाले म्हणजे एकूण २९ वर्षे हा बौद्ध पंडित बडोद्यात होता. यांच्या कारकीर्दीत प्राच्यविद्या संस्थेने वेगाने प्रगती केली. महाराजांनी त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान म्हणून भट्टाचार्यांना 'राजरत्न' व ‘ज्ञानज्योती” या पदव्या दिल्या होत्या. मूळचे बंगालचे असणारे भट्टाचार्य 'बडोद्याचे भट्टाचार्य' म्हणून जगभर ओळखले जात