पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पष्ट करतो. परमानंद गोविंद नेवासकर यांनी 'अनुपुराण' (म्हणजे शिवभारत) हे शिवचरित्र लिहिले. त्यांचा पुत्र देवदत्त व नातू गोविंद यांनी संभाजी महाराजांविषयी केलेले संस्कृत काव्यलेखन म्हणजे 'परमानंदकाव्यम्' होय. या काव्याला ‘परमानंदकाव्यम्” असे नाव गो. स. सरदेसाई व जदुनाथ सरकार यांनी १९५२ मध्ये मूळ संस्कृत संहिता 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' मध्ये प्रसिद्ध करतेवेळी दिले होते.
प्राच्यविद्यामंदिर : अधिकृत स्थापना

 १८९३ मध्येच महाराजांनी या संस्थेच्या पायाभरणीला सुरुवात केली. सुरुवातीस ही संस्था बडोदे येथील वाचनालयाचा एक भाग (संस्कृत विभाग) म्हणूनच कार्यरत होती. 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' च्या माध्यमातून केलेल्या कामातील प्रगती विचारात घेऊन १ सप्टेंबर १९२७ मध्ये 'बडोदा प्राच्यविद्या मंदिर' ही स्वतंत्र दर्जा असणारी संस्थेची विधिवत सुरुवात महाराजांनी केली. हस्तलिखितांचा संग्रह, छापील / प्रकाशित पुस्तके, भाषांतर विभाग इ. प्राच्यविद्या संस्थेतील प्रमुख विभाग होते. प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेवेळी या संस्थेचे पुढील उद्देश स्पष्ट करण्यात आले होते. १) प्राचीन हस्तलिखितांचे अद्ययावत ग्रंथालय विकसित करणे. २) प्राच्यविद्येच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देणे. ३) धर्म आणि तत्त्वज्ञानाची प्राचीन व मौल्यवान संपत्ती जतन करणे. ४) संस्कृत आणि इतर प्राचीन भाषांमधील अस्सल साहित्य प्रकाशित करून प्राचीन भारताचा

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १५