Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी फक्त धर्मअभ्यासासाठी विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले नाही तर, वेगवेगळ्या धर्मातील, जातीतील आणि पंथांतील गुणवान अधिकाऱ्यांची निवड केली. यामध्ये टी. माधवराव, अरविंद घोष, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे, रमेशचंद्र दत्त, एफ.ए.एच. इलियट, काझी शहाबुद्दीन, श्रीनिवास राघव आय्यंगार, रामचंद्र धामणस्कर, केरशास्पजी दादाचनजी, सी. सेडन, व्ही. पी. माधवराव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व्ही. टी. कृष्णम्माचारी अशा अनेकांना बडोद्यात आणून कार्योन्मुख केले. महाराजांच्या सर्वधर्मसमभावाचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण सांगता येईल. धर्म-जातींपेक्षा महाराज अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेला पर्यायाने प्रजेच्या उन्नतीला अधिक महत्त्व देत होते हे वरील उदाहरणावरून लक्षात येते.

 तुलनात्मक धर्मअभ्यास हा सयाजीराव महाराजांचा आस्थेचा विषय होता. इ.स. १९०१ मध्ये विठ्ठल रामजी शिंदेंना तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी परदेशात पाठवले. ही तुलनात्मक धर्म अभ्यासाची सुरुवात नसून तत्पूर्वीच्या महाराजांच्या भाषणातून आणि पत्रांतून याचा वारंवार उल्लेख आढळतो. पुढे १ ऑगस्ट १९९६ रोजी बडोदा महाविद्यालयात तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाचे अध्यासन सुरू केले. कोणतीही बाब सर्वोत्तम होण्यासाठी महाराजांची धडपड असे. याच धोरणानुसार अध्यासनाचे प्रमुख म्हणून केंब्रिज विद्यापीठातील ए. जे. विजेरी यांची नेमणूक केली. अध्यासन सुरू केल्यावर पहिल्याच

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १९