सयाजीराव महाराजांनी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांना इ.स. १९०६ ते इ.स. १९९० या कालवधीत जाती (caste) वरील संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली. 'ऑफ कास्ट इन इंडिया' या प्रबंधाला अमेरिकेतील कोर्नेल विद्यापीठाने पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी जाहीर केली. पुढे या संशोधनाचा दुसरा भाग 'दि हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया' प्रकाशित झाला. भारतातील एका व्यक्तीने जातीवर केलेले पहिले संशोधन होते. हे संपूर्ण संशोधन महाराजांच्या मदतीमुळेच शक्य झाले. महाराजांच्या मदतीनेच ज्ञानकोशाचे खंडही सिद्ध केले.
सयाजीराव महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पदवी ते परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्याचे सर्वश्रुत आहे. डॉ. आंबेडकरांनी जून १९९६ मध्ये 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - अ हिस्ट्रोरिकल अँड अॅनॅलिटिकल स्टडी' हा पीएच. डी. चा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सदर केला. हे संशोधन सयाजीराव महाराजांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेचे, धर्म सुधारणेचे जे मूलगामी अनमोल काम पुढे केले, याचा पाया सयाजीराव महाराजांच्या दातृत्त्वात आहे. हे डॉ. आंबेडकरही प्रांजळपणे मान्य करतात. महाराजांनी डॉ. आंबेडकरांना शिक्षणानंतरही वेळोवेळी मदत केली.