कलाभवनात अनेक विषयात प्रावीण्य संपादन करणारे विद्यार्थी म्हणून ते महाराजांच्या निदर्शनास आले. महाराजांनी त्यांना शिक्षकाची नोकरी करण्यापासून परावृत्त करून फोटोग्राफीच्या कलेच्या उन्नतीसाठी स्वतंत्र संस्था काढण्यास उत्तेजन दिले होते. त्याप्रमाणे शितूत यांनी वरील संस्था काढली होती.
महाराजांनी कलाभवनात शिक्षण घेणाऱ्या हुशार मुलांना नेहमीच शिष्यवृत्ती दिली. शिल्पकार कोल्हटकर असो किंवा दादासाहेब फाळके असो या सर्वांची आपल्या आवडत्या विषयात शिक्षण घेण्याची मोठी सोय यामुळे होऊ शकली. यातून आपल्या व्यवसायात यशस्वी होऊन नाव, कीर्ती मिळविलेले कितीतरी नामवंत कलाकार तयार झाले. त्यांच्या या यशाचा पाया कलाभवनामुळे पक्का झाला होता. नंतर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रसिध्द कलाभवनचे देशभर नाव झाले. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे कलाभवनाच शिकले आणि भारताचा पहिला चित्रपट “राजा हरिश्चंद्र” बनवून, चित्रपट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले आहे.
दादासाहेब आणि बडोदा संबंध
दादासाहेब फाळके म्हणजे धुंडीराज गोविंद फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० ला नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री झाला. त्यांचे वडील गोविंद सदाशिव ऊर्फ दाजीशास्त्री व मातोश्री द्वारकाबाई होत्या. दाजीशास्त्रींनी मंदिरातील