आता मी वृध्द झालो आहे. ६६ वे वर्ष ओलांडत आहे. तरीसुध्दा माझी प्रकृती ठणठणीत आहे. दिवसाकाठी पाच-सहा मैल सहज चालू शकतो. तीन वेळा युरोपला जाऊन आलो आहे. आजही अभिमानाने सांगू शकतो की, मी चहा किंवा सिगारेटला स्पर्शपण केला नाही. येथे सांगायला हरकत नाही की, हे दीर्घ व निरोगी आयुष्य मी जगतो आहे ते मी चांगल्या सवयी जपल्या आहेत म्हणून मी कलाभवनाच्या संवगड्यांना व्यसनापासून दूर राहण्याची विनंती करतो.
मी सयाजीराव महाराजांना व कलाभवनाला दीर्घ आयुष्य चिंतितो."
- दादासाहेब फाळके
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब
भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके हे जणू महाराजा सयाजीराव गायकवाड यांची प्रतिकृतीच होते. आज या दोन्ही नाशिकच्या सुपुत्रांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले आहे. दादासाहेबांनी अनेक कला शिकण्याचा ध्यास घेतला. त्या शिकताना झोकून देऊन त्यांनी काम केलं. महाराजा सयाजीरावांनीही आयुष्यभर जनकल्याणाचा ध्यास घेत बडोद्यात साहित्य, कला, संस्कृती, सुप्रशासन, शेती-उद्योग