पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्या सोबतच स्वातंत्र्ययोदयाचे खंबीर पाठीरीखे, या ही गोष्टींचा ध्यास घेतला होता. या कामात दादासाहेब आणि महाराजांचे एक महत्त्वाचे साम्य दिसून येते. दोघेही आयुष्यभर निर्व्यसनी होते. प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी दररोज नियमित चालण्याचा व्यायाम केला. आजूबाजूच्या मंडळींना व्यसनापासून दूर राखण्याचा प्रयत्न केला.

 इ. स. १९१० मध्ये त्यांनी नगर विकास सुधारणा विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याला प्रथम चित्रपट गृह इ. स. १९२९ मध्ये निर्माण केले. तेच पुढे शिवाजी - चित्रभवन व नंतर Prince टॉकीज या नावाने प्रसिध्द झाले. इ. स. १९३४ मध्ये बडोदे आकाशवाणीच्या स्थापनेची घोषणा झाली. ( City Improvement Trust) सहकारी मंडळी, Bank of Baroda, वृक्षारोपण अशाप्रकारे अनेक उत्तम कामे करून सयाजीरावांनी हे सिध्द केले की ते केवळ एक राजा नसून प्रजापती, प्रजापालक पिता व नेता तसेच स्वतः बडोदा नगरीचे विश्वस्त आहेत. महाराजांनी बडोदे राज्याला “संस्कार नगरी” चा मान मिळवून देण्यासाठी तन, मन आणि धन ओतून कार्य केले, हे सहज लक्षात येते. म्हणूनच आज आपण कितीही प्रगत असलो तरी १४० वर्षांपूर्वी महाराजांनी प्रगत राष्ट्रासाठी जे धोरण अवलंबविले, ते आजही लागू पडत आहे,

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २८