निर्मिती केली. आर्थिक विवंचनेतच ६ फेब्रुवारी १९४४ ला वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे नासिक येथे निधन झाले.
दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून १९६९ साली भारत सरकारने 'दादासाहेब फाळके 'पुरस्कार' देण्यास सुरुवात केली. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. याचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय टपाल खात्यानेही दादासाहेबांच्या सन्मानार्थ १९७१ साली त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. मुंबई येथील चित्रनगरी (फिल्मसिटी) आता दादासाहेब फाळके चित्रनगरी या नावाने ओळखली जाते. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी २००९ साली “हरिश्चंद्राची फॅक्टरी” या चित्रपटातून दादासाहेबांचे कार्यकर्तृत्व प्रेक्षकांसमोर आणले.
महाराज सयाजीराव गायकवाडांच्या कल्पकतेमधून सुरू केलेल्या कलाभवनाने भारताला अनेक रत्ने दिली. या रत्नांनी त्यांच्या अद्वैत कार्याने भारतला प्रगत बनविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. महाराजांनी आधुनिक भारताचे पाहिलेले स्वप्न कलाभवनात शिकलेल्या विद्यार्थांनी पूर्ण केले. कलाभनवाची स्थापना हा निर्णय किती काळाच्या पुढे होता, हे आज आपल्याला जाणवते. कलाभवनात तयार झालेले हे रत्न आज अजरामर