या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
करताना सामाजिक अडचणींबरोबरच आर्थिक अडचणींनाही त्यांना सामोरे जावे लागले. चित्रपटात काम करण्यासाठी स्त्री कलावंतासोबतच पुरुष कलावंतही तयार होत नसत. अशावेळी गरज पडल्यास ते स्वतः किंवा कुटुंबीयांपैकी कोणालातरी ते उभे करीत. सुरुवातीच्या त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रांच्या भूमिकाही त्यांनी पुरुषांकडूनच करून घेतल्या. त्यांना अनेक कला अवगत असल्यामुळे, त्याचा उपयोग त्यांनी चित्रपटनिर्मिती करताना केला. त्यामुळे ते चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम असत. त्याकाळी परदेशातही चित्रपट निर्मिती करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. पण त्या मोहाला बळी न पडता त्यांनी भारतातच चित्रपट निर्मिती केली. आपल्या दैदिप्यमान कारकीर्दीत त्यांनी एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची
महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २२