पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले आहेत. सयाजीरावांनी योगी अरविंद घोष, बाबासाहेब आंबेडकरांसारखी रत्ने पदरी बाळगली होती. दादासाहेब फाळके असेच बडोद्याच्या राजमुकुटातले एक चमकणारे रत्न होते. ज्याचा आज बडोदेकरांना अभिमान वाटतो.
 भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचा बडोद्याशी असलेला ऋणानुबंध त्यांच्याच शब्दात फार काही सांगून जातो. ते लिहितात,
 “जेव्हा प्राध्यापक गज्जर चाळीस वर्षांपूर्वी कलाभवनाचे प्राचार्य होते तेव्हा मी कलाभवनाचा विद्यार्थी होतो. माझी चित्रकला, छायाचित्रण, मातीची शिल्पकला वगैरेचे काम पाहून खूपच खुश झाले. तेव्हा त्यांनी मला शिष्यवृत्ती तर दिलीच; पण उदार मनाने कलाभवनाची प्रयोगशाळा व कलादालन यांचा मुक्त वापर करण्याची परवानगी दिली आणि मला वाटते या औदार्याचा चांगला उपयोग मी केला. फोटो अनग्रेव्हिंग व फोटो प्रिंटिंग वर्क हे त्या ज्ञानाचेच फळ आहे. गोऱ्या साहेबांनी त्या खूप कौतुक केले आहे. त्या काळात श्री. डब्ल्यू रे ही एकच व्यक्ती होती, ज्यांच्याकडे हे कलादालन होते. नंतर एका श्रीमंत व्यक्तीच्या पैशाच्या गुंतवणुकीमुळे माझ्या स्टुडिओचे रुपांतर लक्ष्मी आर्टवर्कमध्ये झाले.

 आता माझा व्यवसाय इनॅमलिंग, फोटो सिरॅमिक, मातीची शिल्पकला हा आहे. त्यास चांगले भवितव्य आहे असे मला

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २४