पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याचे कलाभवन आणि दादासाहेब
 कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले. याचबरोबर इ.स. १८९० ला त्यांनी छायाचित्रण, प्रकाश शिलामुद्रण ( फोटोलिथोग्राफी) या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. कलाभवनाचे प्राचार्य टी. के गज्जर हे खूप कल्पक होते. महाराजा सयाजीरावांनी गज्जरसारखे प्राचार्य कलाभवनाला दिल्यामुळे कलाभवनाचे कार्य अतिशय उत्तम चालले होते. महाराजांचे वैयक्तिक लक्ष कलाभवनाकडे विशेष होते. कलाभिरुची भावी पिढी तयार करण्याचे काम कलाभवन करत होते. त्याकरिता विविध कलांची आवड असलेले विद्यार्थीच हे काम करतील, या दृष्टीने संस्कार केले जाऊ लागले. महाराजांची सामाजिक सुधारणांची कल्पकता आणि त्याला दूरदृष्टीची जोड मिळाल्याने पुढे भारतात दादासाहेब फाळकेंसारखे रत्न निर्माण झाले. महाराज रत्नपारखीच होते म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 कलाभवनात ओतकाम, सुतारकाम, लोहारकाम, घड्याळ दुरूस्ती हेही कौशल्य विषय शिकवले जात होते. येथे शिकणाऱ्या हुशार मुलांना शिष्यवृत्ती मिळत असे. शिक्षणास लागणारी साधने विनामूल्य मिळत असत. सर्व शिक्षक त्यांच्या विषयात खूप कुशल होते. त्यावेळेस कलाभवन हे राजमहल समोरच्या

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / ११