पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोट हवी होती. महाराजांच्या इच्छेनुसार मेसर्स पंड्या व न्युहॅम यांनी अशी बोट खरेदी करून 'साल्टेअर' या जहाजाने भारतात पाठविली. लहान आकाराच्या 'शूटिंग रेंज' बद्दलची सर्व माहिती महाराजांना देण्यात आली होती. ही रेंज बडोदा कॉलेजमध्ये सुरू करावी असे महाराजांना वाटत होते. सयाजीराव ७ महिने २० दिवसांच्या परदेश वास्तव्यानंतर ३१ ऑक्टोबर १९३८ ला स्वदेशी परतले.
सयाजीरावांच्या २६ जगप्रवासाच्या अहवालांचा वरील धावता आढावा आपल्याला थक्क करून सोडतो. कारण एका राज्यकर्त्या राजाच्या जगप्रवासाचा इतिहास म्हणून जेव्हा आपण या अहवालांकडे पाहतो तेव्हा थक्क होऊन जातो. कारण या जगप्रवासांचा उद्देश हा जरी आरोग्यसंवर्धन असला तरी या जगप्रवासाने फक्त महाराजांनाच बौद्धिकदृष्ट्या समृद्ध केले असे नाही तर या जगप्रवासाने बडोदा संस्थानात जागतिक दर्जाची शासनव्यवस्था निर्माण केली. भारताला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, साहित्य, संस्कृती, शेती, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात बलशाही आणि आधुनिक बनविले. विशेष म्हणजे या सगळ्याचा बडोदा संस्थानानंतरचा लाभार्थी हा महाराष्ट्र आहे हेसुद्धा येथे लक्षणीय ठरते. सर्वात महत्वाचे म्हणजे एक राजा किती प्रजाहितदक्ष असू शकतो याची सर्वोच्च अनुभूती या अहवालातील तपशिलांवरून येते. एका अर्थाने शिवरायांनी पाहिलेल्या 'सुराज्य स्वप्नांचा' हा यशस्वी पाठलागच

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७४