पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यास करण्याचे ठरविले. महाराजांनी डॉ. नानावटी यांच्या मदतीने फिजीओलॉजीचा अभ्यास सुरू केला आणि वनस्पती शास्त्रासाठी नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रा. अलस्टोन यांची नियुक्ती केली. श्री. न्यूहॅम यांनी महाराजांना ट्रेवेलियन लिखित ‘इंग्लंडचा इतिहास' वाचून दाखविला. तर सयाजीरावांनी स्वतः 'थेअरी ऑफ लेजिस्लेशन' हे बेंथम यांचे पुस्तक वाचले. परदेश दौऱ्यावेळी विविध खेळ खेळणे, नाटके, चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे या माध्यमातून महाराजांचे मनोरंजन होत असे. पुस्तके वाचण्याबरोबरच दौऱ्याची टिपणे तपासणे, त्यात दुरूस्ती करणे आणि काही बाबींची त्यात भर घालण्याचे कामही महाराज करत असत. महाराजांनी केनसाईन टोन सेंट्रल स्कूलला भेट देतेवेळी तेथील दोन-तीन गरीब विद्यार्थांना सुट्टीच्या काळात नार्वेत पाठविण्यासाठी १० डॉलर दिले होते.
 हंगेरी येथील कुमारी ब्रुनेर व अन्य एक महिला चित्रकार अशा दोन व्यक्तींना बडोदा संस्थानच्या सेवेत रुजू करण्याच्या महाराजांच्या इच्छेनुसार श्री. न्यूहॅम यांनी त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. ज्यामुळे या दोन महिला कलावंतांनी हिवाळ्यात बडोद्याला येण्याचा करार केला. लौसन्ने येथे असताना महाराजांनी लौसन्ने भागातील गरजूंना मदत करण्यासाठी असणाऱ्या क्वीन व्हिक्टोरिया ज्युबिली फंडाला २० पौंडांची देणगी दिली. महाराजांना प्रशस्त जागा आणि इंजिन असणारी

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७३