पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मदत दिली. डॉ. सय्यद मुस्तफा अली हे हॅले विद्यापीठात डॉक्टरेट करत होते. अरबी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ते कैरोला आले होते. महाराजांनी अली यांना कैरोतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी १०० पौंडांची मदत केली. ३० मार्च १९३५ ला सयाजीरावांनी रजत महोत्सवी वर्षासाठी ५०,००० रुपयांचे भाग भांडवल दिले, तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या पुतळ्यासाठी १,००० रुपयांचे अनुदान दिले. पॅरिसमधून २२ मार्च १९३५ ला महाराजांनी बडोद्यात दिवाणांना तार करून प्रो. बूच यांना तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्याचे आदेश दिले. लंडनमध्ये असताना महाराजांनी पूरोहित स्वामी यांच्या 'गीता' या अनुवादीत पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि या पुस्तकाच्या १२ प्रतीही विकत घेतल्या.
 महाराजांनी भारतात चालवलेल्या ग्रंथालय चळवळीमुळे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ लंडनमध्ये 'द लायब्ररी रिव्ह्यू अँड फ्रेंडस'तर्फे स्नेहभोजनचा कार्यक्रम ठेवला. सयाजीरावांनी भारतीय कलेचा अभ्यास करणाऱ्या इंडियन सोसायटीला मागील ५ वर्षे देत असलेली देणगी आणखी २ वर्षे सुरू ठेवण्याचे आदेश दिले. ११ जून १९३५ ला महाराजांना हॉलंड येथील केने विद्यापीठाचे मानद सभासदत्व देण्यात आले. १ जुलै १९३५ ला झालेल्या विश्वधर्म परिषदेच्या सभेला महाराज उपस्थित होते. या सभेतून परतल्यावर महाराजांनी सभेचे अध्यक्ष सर फ्रान्सिस यंगहसबंड यांना जुलै १९३६ मध्ये भरणारी विश्वधर्म परिषद

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६८