पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेट दिली. सयाजीरावांनी प्राचार्यांकडून शाळेच्या इमारती संदर्भातील आराखडे मागून घेतले. ही शाळा पाहून महाराज अशाच प्रकारची शाळा बडोद्यात उभी करण्याचा विचार करत होते. महाराज ही ५ महीने ३ दिवसांची महत्वपूर्ण परदेशवारी संपवून २३ ऑक्टोबर १९३३ ला मुंबईत पोहोचले.
तेविसावा प्रवास : १९३४
 ९ एप्रिल १९३४ ते ७ नोव्हेंबर १९३५ असा १८ महिने २९ दिवसांचा महाराजांचा हा युरोप प्रवास होता. इटलीत असताना सयाजीरावांनी 'गायकवाड ऑफ बडोदा ग्रेटर इंडिया रिसर्च एक्सपीडिशन' या डॉ. क्वॉरिच वेल्स यांच्या संस्थेला ५०० पौंडांचे अनुदान मंजूर केले. ऑस्टेरली पार्क, एल्डवर्थ येथील भारतीय जिमखान्याला महाराजांनी १२५ पौंडांची देणगी दिली. लंडनमधून महाराजांनी १०६ पौंडांचा कॅमेरा विकत घेवून कोल्हापूरच्या राजाराम महाराजांना भेट दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना सयाजीरावांनी व्हाइट हाऊसवर भेट दिली. सयाजीरावांनी केर्न इन्स्टिट्यूट, लंडन, हॉलंडला ४५० पौंडांची देणगी दिली. त्यातील ५० पौंड संस्थेला तर उर्वरित डच ईस्ट इंडिज सरकारला दिले. कारण त्यांनी बाली येथील दस्ताऐवज ठेवण्याच्या केलेल्या महत्वपूर्ण कामामुळे भारतीय पुरातन संस्कृतीवर प्रकाश टाकण्याचे काम झाले.
  गस्टाडच्या मुक्कामात सयाजीरावांनी अनेक धार्मिक पुस्तके वाचली. त्यांनी धर्म अभ्यास करणाऱ्या एका संस्थेला ५ गिनी

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६७