पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दौऱ्यात झाले. एकाच वेळी एवढ्या विषयांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय घेणारे सयाजीराव आजअखेरचे एकमेव प्रशासक आहेत.

 सॉटचे 'हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन' आणि फिपूचे 'मॉडर्न हिस्ट्री ऑफ युरोप' या दोन पुस्तकांचा अनुवाद, नागरिकांचे हक्क काय, त्यांची कर्तव्ये काय आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचे विवरण या विषयावर टिपण तयार करून त्याचा सोप्या भाषेत अनुवाद करून १५ १८ वर्षे वयाच्या मुलांना सहज लक्षात येतील अशा पद्धतीने त्याची रचना असावी अशी सूचना केली. या टिपणाबरोबरच भारतातील लोकांच्या फायद्यांसाठी ज्या औद्योगिक योजनांचा समावेश करता येऊ शकेल यावर विशेष भर दिलेला, ज्यामध्ये खालील प्रकरणांचा समावेश असावा असा ग्रंथ तयार करण्याची सुचना दिली. १. युनायटेड स्टेटच्या औद्योगिक विकासासाठी सरकारी पातळीवर किंवा अन्य मार्गांनी कसे प्रोत्साहन देण्यात आले, त्याचे स्वरूप आयात-निर्यातीसंबंधित आकडेवारी पण विचारात घ्यावी. २. अमेरिकेतील शिक्षण पद्धती ३. अमेरिकेतील कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडित औद्योगिक व्यवसाय ४. वाढत्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे हितसंबंध ५. कामगार संघटना, त्यांची रचना कशी असते आणि त्यांचे नियंत्रण करण्याची पद्धती ही

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४६