पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व टिपणे अशा सामान्य जनतेसाठी असावीत, जी फारशी शिकलेली नाही. औद्योगिक विकास या प्रकरणात अमेरिकेची युरोपच्या अन्य देशांतील विकासकार्याबरोबर केलेल्या तुलनेचा समावेश असावा.

 या सूचनेत शेवटी औद्योगिक विकास प्रकरणात अमेरिकेची युरोपच्या अन्य देशातील विकासाशी तुलना असावी अशी महत्वाची सूचना महाराजांनी केली होती. याच दौऱ्यात बडोदा कॉलेजच्या वसतिगृहासाठी ५० हजार रु. खर्च करणे, विश्वामित्रीवर दोन पूल बांधणे त्याचप्रमाणे राज्यातील वेगवेगळे रेल्वे लाईन्स बांधण्याच्या योजना आखल्या. बम्पस या अमेरिकन तज्ञावर बडोद्यासाठी उद्योगधंद्यातील तज्ञ आणण्यचि जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आले.

आठवा प्रवास : १९१०

 सातव्या जगप्रवासानंतर ३ वर्षे ४ महिन्यांनी महाराजांनी त्यांचा आठवा जगप्रवास केला. हा जगप्रवास इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका या देशांचा होता. ३० मार्च १९१० ते १६ डिसेंबर १९१२ या दरम्यान २ वर्षे ४ महिने १७ दिवस महाराज परदेशात होते. या प्रवासात महाराज प्रथम कोलंबोला गेले. तेथून पेनांगल, सिंगापूर, हॉंगकॉंग, मकाऊ, शांघाय, नागासाकी, याकोहामा, किओतो, टोकियो असा प्रवास केला. याकोहामा येथे इनोसिमा येथील बौद्ध मंदिराला व गुफांना महाराजांनी भेट

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४७