पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकृतपणे इलियट यांना बरोबर नेण्यास भारत सरकारने परवानगी नाकारल्यामुळे महाराजांचे मित्र म्हणून ते सोबत गेले. या दौऱ्यात पहिल्या दौऱ्यातील आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनातील त्रुटी विचारात घेवून अनेक सुधारणा घडवून आणल्या. यामध्ये महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार करण्यासाठी एक समिती स्थापन करून त्या समितीमार्फत कामकाजाचे नियोजन करण्यात आले. या दौऱ्यात महाराजांनी झेरमॅट या ठिकाणी शरीरस्वास्थ्यासाठी वास्तव्य केले. याचा त्यांच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. या दौऱ्यात बडोद्याच्या आठवणीने महाराज बऱ्याचदा व्याकूळ होत. या परदेश दौऱ्यात महाराजांनी राज्यकारभाराबाबत फारसे काही महत्वाचे काम केले नाही.

 या दौऱ्यात महाराजांनी एकूण ११ हुजूर हुकूम काढले. यामध्ये महसूल विभागातील दोन हुशार व चतुर कारकुनांना लघुलेखन शिकण्यासाठी मुंबईला पाठवणे, मकरपुरा व लक्ष्मीविलास राजवाड्याच्या भोवतालच्या उद्यानांच्या देखभालीसाठी गोल्डरिंग या युरोपियन माळीची नियुक्ती, मकरपुरा राजवाड्यात जनरेटर बसवणे, झिंगारा बोटीची खरेदी, पेटलाद-आनंद रेल्वे कार्यान्वित करणे, लक्ष्मीविलास राजवाड्याच्या भोवतीच्या रस्त्यांचे नकाशे आणि जनतेच्या माहितीसाठी 'बडोदा वाटचाल' या पाक्षिकाच्या प्रकाशनाची योजना, गिरोनी नावाचा चित्रकार निसर्गचित्र काढण्यासाठी बडोद्याला पाठवणे,

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / २६