पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इगं ्लंडमध्ये नेऊन अटक करतील, इलियट नावाच्या गुरूमुळे महाराजांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, महाराज आता ख्रिस्तान होणार - हिंदूचं ्या दृष्टीने धर्मांतर हे पाप या आशयाच्या चर्चा बडोद्यात सरुु झाल्या. या दौऱ्यात महाराजांनी एकूण १३ हुजूर हुकुम काढले. ते फारच महत्वाचे आहेत. विस्तारभयास्तव येथे आपण फक्त त्यांचा आशय चर्चेत घेऊ. यामध्ये गणदेवी येथे सरुु के लेला साखर कारखाना नफ्यात चालविण्यासाठी या कारखान्यात तयार होणारी साखर शुभ्र होण्यासाठी त्यामध्ये हाडाचा चुरा वापरण्याचा महाराजांना दिलेला सल्ला नाकारणारा आदेश, पॅलेस ग्रंथालयासाठी १५०० ग्रंथ खरेदी करणे, इग्रं जी पुस्तकांसाठी १ लाख रु. व ससं ्कृत पोथ्यांसाठी ३० हजार रु. देण्याचा आदेश, ‘Cassel’s Dictionary of Cookery’ या पुस्तकाचे भाषांतर, ससं ्कृत व इग्रं जी भाषांचे ग्रंथ एत्तदेशीय भाषेत भाषांतर, बडोद्यात वस्तू सग्रं हालय स्थापणे, वनविकास विद्येच्या अभ्यासासाठी इगं ्लंडला दोन व्यक्ती पाठविणे, जनरेटर, लिफ्ट आणि शिपायांना बोलावण्यासाठी विद्युत बेल बसवणे या आदेशांचा अंतर्भाव होतो.

 महाराजांचे वरील आदेश विचारत घेतले तर पहिल्या परदेशवारीत महाराजांनी बडोद्यातील ‘नवनिर्माण’ चळवळीची धमाक्यात सरुु वात के ली होती असे म्हणता येईल. ज्ञान आणि विज्ञान याबाबत महाराज किती दक्ष होते याची प्रचिती वरील आदेशावरून मिळते. या जगप्रवासाने महाराजांच्या प्रकृतीमध्ये

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / 24