पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करत होते. महाराजांना युरोपचे आकर्षण होते. काही दिवस ऑक्सफर्डमध्ये विद्यार्थी म्हणून राहण्याची महाराजांची इच्छा होती.
 युरोपातील शिक्षण व्यवस्थेचे महत्व महाराजांनी आपल्या पहिल्या परदेश प्रवासाअगोदरच ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी आपले लहान भाऊ सपं तराव, पुतणे गणपतराव आणि जिवलग मित्र खासेराव जाधव यांना १८८४ मध्ये शिक्षणासाठी इगं ्लंडला पाठविले होते. खानगी कारभारी जयसिगं राव आंग्रे स्वखर्चाने इगं ्लंडला गेले होते. त्यांना युरोपचे वाटणारे आकर्षण त्यांनी जयसिगं राव आंग्रेंना २८ ऑगस्ट १८८६ ला युरोपला पाठविलेल्या पत्रात व्यक्त झाले आहे. या पत्रात महाराज लिहीतात, ‘मला खरं म्हणजे आपला हेवा वाटतो. तुमच्या सारखंच युरोपात यावं असं मला वाटत पण ते काही वास्तवात होईल असे दिसत नाही.’ पुढे निद्रानाशाच्या आजारावर उपचार म्हणून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा आणि युरोपवारीचा सल्ला दिला. या प्रवासाची सपं ूर्ण जबाबदारी महाराजांचे गुरु एफ.ए.एच.इलियट यांच्यावर सोपविण्यात आली. महाराजांनी प्रवासातील मुख्याधिकारी म्हणून रामचंद्र धामणस्कर आणि सहाय्यक अधिकारी म्हणून व्ही.एम.समर्थ यांना बरोबर घेतले.

 महाराजांच्या या पहिल्या परदेश प्रवासावर बडोद्यात उमटलेल्या प्रतिक्रिया फारच नकारात्मक होत्या. याचे प्रतिबिंब एका निनावी परिपत्रकात दिसते. यामध्ये ब्रिटीश महाराजांना

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / 23