पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या प्रस्तावित ग्रंथाच्या आराखड्याबाबत संपादक व्ही. पी. नेने यांनी महाराजांकडे मार्गदर्शन मागितले असता २३ जानेवारी १९३७ च्या पत्रात महाराजांचे सचिव न्युहॅम यांनी नेनेंना पुढील अपेक्षा कळविल्या. 'या ग्रंथास दैनंदिनी अथवा रोजनिशीचे रूप द्यावयाचे नाही. माझ्या आणि महाराजांच्या विचारात जी योजना आहे ती अशी की, योग्य त्या आकारातील प्रकरणांमधून प्रवासाचा वृत्तांत असा मांडावा की ज्यामधून महाराजांना मिळालेला नवा दृष्टिकोन दिसावा, रोचक प्रसंगांचे वर्णन वे आणि महत्त्वाचे म्हणजे या लिखाणातून महाराजांचे व्यक्तिमत्त्व केवळ शासनकर्ता किंवा प्रशासक म्हणून मुखर न होता. त्यांच्यातील निखळ माणूस वाचकाच्या दृष्टीस यावा. हे काम किती अवघड आहे हे मला माहीत आहे पण येणाऱ्या भावी पिढीसाठी ते फार लाभदायक आहे हे तितकेच खरे. '

 ग्रंथाच्या आराखड्याबाबत व्यक्त केलेल्या अपेक्षा फारच मुलभूत आहेत. कारण या ग्रंथातून महाराजांच्या दृष्टीकोनाच्या विकासाला परदेशप्रवासाने काय दिले हे स्पष्ट व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे. यामागील महाराजांची भूमिका फारच व्यापक असावी. परदेश प्रवास हा ज्ञानमार्गी असावा, त्यातून व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल व्हावेत, आपला देश धर्म संस्कृतीकडे वैश्विक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा हा ग्रंथ वाचणाऱ्याला मिळावी असा

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १८