पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टीकोन व्यक्त होतो. ग्रंथाच्या आराखड्यात व्यक्त केलेल्या अपेक्षांमध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे महाराजांची ओळख एक 'निखळ माणूस' म्हणून या ग्रंथातून व्हावी. ही अपेक्षा फारच महत्वाची आहे. कारण एखादी व्यक्ती राजा असली तरी पहिल्यांदा ती माणूस असते. राजाकडे अतिरेकी लक्ष दिल्यामुळे त्याच्यातील माणसाच्या आकलनाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. परिणामी त्याचे व्यक्तिमत्व समजून घेण्यामध्ये तसेच त्याचे मूल्यमापन करून निष्कर्ष काढण्यामध्ये आपण कमी पडतो. महाराज प्रत्येक बाबीकडे किती बारकाव्याने आणि तटस्थपणे पाहत होते हे समजून घेण्यासाठी महाराजांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षा महत्वपूर्ण ठरतात.

 महाराजांनी केलेल्या सर्व जगप्रवासांची कालसूची पुढे देत आहोत. ही कालसूची देण्यामागची भूमिका अशी आहे की महाराजांच्या जगप्रवासाचा वाचकांना तुलनात्मक परिचय व्हावा. प्रत्येक जगप्रवासाचा कालावधी, महाराजांनी भेट दिलेले देश यांचा अंदाज यावा.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १९