पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांपूर्वी हा घेतलेला निर्णय निश्चितच क्रांतिकारी होता. त्यांच्या या निर्णयानुसार प्रत्येक गावोगावी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या गेल्या. दुष्काळ पडताच इतर दुष्काळी कामाबरोबर विहिरी आणि तलाव खोदण्याची कामे सुरू केली. यामुळे प्रजेला काम तर मिळालेच त्याचबरोबर दीर्घकालीन पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले.
 बडोदा हे राजधानीचे शहर होते. तेथे पाण्याची कमतरता होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची कमतरता विचारात घेत महाराजांनी आजवा धरणाची निर्मिती केली. त्यावेळी महाराजांनी या जलाशयाचे काम किती महत्त्वाचे होते हे स्पष्ट केले. ‘कलाकुसरीच्या माहेरघरासारखा असलेला हा राजनिवास (लक्ष्मीविलास राजवाडा) काय किंवा मि. गोल्डरिंग यांनी ज्याच्या सभोवती एक सुंदर व रमणीय उपवन नुकतेच निर्माण केले आहे असा मकरपुरा राजवाडा काय, ही काही लोकोपयोगी कामे नव्हती. म्हणून आज हा शुद्ध व निर्मल जलाशय बडोदावासीयांना बक्षीस देताना मला निरतिशय आनंद होत आहे.' शुद्ध पाण्याला प्रजेच्या आरोग्यात महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी वेळोवेळी भाषणातून स्पष्ट केले.

 बडोदा राज्यातील प्रजेला स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी मिळावे यासाठी सयाजीराव महाराजांनी खूप उदारतेने खर्च केला. बडोदा येथील सयाजी सरोवरासाठी ५१ लाख, पाटण येथील सरोवारासाठी सात लाख, शिनोर, भादरण, सोजीत्रा

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / ८