पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९. पांडुरंग बळवंतराव भोसले - सुरुवातीला कोल्हापूर संस्थानात मामलेदार, नंतर ग्वाल्हेर व देवास संस्थानात
३०. यशवंतराव गोविंदराव सावंत - डे. मराठा ए. असोसिएशन व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सभासद
३१. राजाराम सातोबा परब - बडोदा लष्करात लेफ्टनंट
३२. डॉ. बळवंत रावजी पाटील - कोल्हापूर संस्थानात सब असि. सर्जन
३३. गणपतराव रावजी मंडलिक- कोल्हापूर संस्थानात मामलेदार
३४. कृष्णाजी बळवंत सूर्यवंशी - मुधोळ संस्थानात अधिकारी
३५. गणपतराव कृष्णाजी कदम - कोल्हापूर संस्थानात वकील
३६. रामचंद्रराव आसवले मराठा व मागास जातीतील मुलांसाठी मांडवीत मोफत शाळा
३७. गणपतराव भाऊराव तावडे - बडोदा संस्थानात डिस्ट्रीक्ट सेशन जज्ज
३८. जयराम जनार्दन सावंत - बडोदा संस्थानात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर
३९. रामचंद्रराव रावजी पवार - बडोदा संस्थानात अधिकारी, बडोदा संस्थानतर्फे अमेरिकेत उच्चशिक्षण

४०. नथाजी माणकु पवार - कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये पर्शियन भाषेचे शिक्षक

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३४