पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षात याबाबत काहीही झाले नाही. हे स्मारक योग्यवेळी झाले असते तर मराठ्यांचा बौद्धिक इतिहास फारच उंचावला असता.
 कोल्हापूरचे पांडुरंग चिमाजी पाटील (पी.सी.) हे डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर कृषी पदवीधर झाले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पहिले भारतीय प्राचार्य होते. १९१६ ते १९२१ या कालावधीत ते डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सचिव तर १९२३ ते १९५३ या काळात अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असताना १९३२ मध्ये त्यांनी गंगारामभाऊंचे स्मारक उभारण्यासाठी दोन वर्षे सातत्याने आणि स्वखर्चाने प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलनाचा प्रयत्न केला. हा गंगारामभाऊंच्या स्मारकाचा पहिला प्रयत्न होता. परंतु दुर्दैवाने हा प्रयत्न पूर्णत्वास गेला नाही.

 मराठ्यांचे उद्धारकर्ते म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर थेट राजर्षी शाहू महाराजांकडे जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड, खासेराव जाधव यांनी मराठ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षाचा पायाभूत प्रयत्न अतिशय विचारपूर्वक घातला होता. या दोघांच्या प्रयत्नाशी सुसंगत काम गंगारामभाऊ म्हस्केंनी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या भक्कम आर्थिक सहकार्याने १३५ वर्षांपूर्वी सुरू केले होते. मराठ्यांच्या दारिद्र्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते या वास्तवाला भिडण्याची दूरदृष्टी गंगारामभाऊंनी त्यावेळी दाखवली नसती तर आज मराठ्यांमध्ये जी शैक्षणिक

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २९