पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुष्काळात शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी बडोदा सरकारने बारा हजारांहून अधिक विहिरी खोदल्या. त्याचबरोबर विहिरीवर ऑइल इंजिन बसविण्यास प्रोत्साहन दिले. याच्याही पुढे जाऊन शेती नांगरण्यासाठी जर्मनीतून ट्रॅक्टर मागविण्यात आला. खासेरावांनी जर्मनीहून हा पहिला ट्रॅक्टर मागविण्यास मदतही केली. त्याचबरोबर पाशाभाई पटेल या गुजराथी उद्योगपतीस ट्रॅक्टरचा कारखाना काढण्यास प्रोत्साहनही दिले. सुधारित बी-बियाणे, फळबागांची लागवड, शेतीला कुक्कुटपालन हा जोडधंदा, दूध संकलन या विविध कल्पना खासेराव जाधवांच्या होत्या. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपला शेतीमाल विकावा म्हणून शेतकऱ्यांचे गटही त्यांनी निर्माण केले. शेतीतून निघणारे उत्पन्न विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देताना शेतीमालांचे प्रदर्शन भरवण्याची कल्पनाही खासेरावांनीच रुजविली. त्याच्याही पुढे जाऊन खासेरावांनी १९२० च्या सुमारास पिकावर पाण्याच्या फवारा पद्धतीचा वापर करून शेती करण्यास सुचविले. ही फवारा पद्धत म्हणजे आजची स्प्रिंक्लर पद्धत होय. शेतीसाठी खासेरावांनी राबविलेल्या या विविध योजना सयाजीरावांचा खासेरावांना शेतकी शिक्षणासाठी परदेशात पाठविण्याचा निर्णय किती योग्य होता याची साक्ष देतात.

 महाराज जरी आरोग्य स्वास्थ्यासाठी परदेश प्रवास करत असले तरी परदेशात जे जे उत्तम आहे ते ते आपल्या संस्थानच्या

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १०