पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मशास्त्राला हात घातल्यामुळे त्यांना शेवटपर्यंत भारतातील ब्राह्मणी ज्ञानव्यवस्थेने कसे बहिष्कृत ठेवले याची चर्चा अगोदर झालीच आहे. बहुजनांनीही आजअखेर यापेक्षा वेगळे काही केले असे म्हणता येत नाही. एकच दिलासादायक बाब म्हणजे बाबा भांड साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी समग्र केळुसकर हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांचे हे काम भावी अभ्यासकांसाठी फार मोलाचे आहे. कारण यामुळे केळुसकरांचे जवळजवळ सर्व वाङ्मय संवर्धित झाले.
 शूद्र म्हणून केळुसकरांना त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही ज्ञानक्षेत्रात अस्पृश्य ठरवले. परंतु याच व्यवस्थेने त्यांचा उच्चवर्णीय असा उल्लेख करून एकप्रकारे त्यांची नव्याने विटंबना केली. याचा संदर्भ जेम्स लेनचा 'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जिजाऊंची बदनामी करणारा म्हणून चर्चेत आला. त्यावर बंदीसुद्धा आली. परंतु याच ग्रंथात केळुसकरांची जात बदलली आहे हे मात्र त्यावेळी हा लढा लढवणाऱ्या बहुजन इतिहासकारांच्या लक्षातसुद्धा आले नाही. या ग्रंथात केळुसकरांचा उल्लेख 'Saraswat social reformer' असा केला आहे. ज्ञानव्यवस्थेकडून होणाऱ्या दुहेरी शोषणाचे हे उदाहरण भारतीय समाजाच्या अभ्यासात 'जात' हा घटक समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करतो.
 केळुसकरांच्या शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राच्या अनुषंगाने जेम्स लेनच्या वरील प्रकरणाला जोडून एक महत्त्वाचा

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५२