पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराष्ट्र आणि सयाजीराव हे नाते 'अदृश्य' दुवे जोडून तपासल्याशिवाय महाराष्ट्राचा 'पुरोगामी' नकाशा पूर्ण होत नाही. महाराष्ट्राला सयाजीरावांनी भरपूर आर्थिक मदत केली. महाराष्ट्रातील महात्मा फुलेंपासून अनेक महापुरुषांच्या मागे ते हिमालयासारखे खंबीरपणे उभे राहिले. हे आपल्याला महाराजांचे फार मोठे योगदान आहे. या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला 'ज्ञानाधिष्ठित' करण्यामध्ये त्यांनी अधिक रस घेतला. यासाठी ग्रंथनिर्मिती, ज्ञानी लोक आणि सेवाभावी संस्था यांना त्यांनी ज्ञानाचे अधिष्ठान दिले. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात आपण गेलो तर महाराजांचा 'आशीर्वाद' लाभलेली व्यक्ती किंवा संस्था आपल्याला नक्की सापडते. महाराष्ट्राच्या या 'अद्वितीय' भूमिपुत्राने या 'शिवभूमीत' केळुसकरांसारखी शेकडो ज्ञानी माणसे अक्षरश: पेरली. त्यामुळेच महाराष्ट्राचा हा पुरोगामी ‘वटवृक्ष' ज्ञानवान आणि ऊर्जामय झाला. केळुसकर गुरुजी म्हणजे या ज्ञानवृक्षाला ऊर्जा पुरवणारे 'इंजिन' होते. तर या इंजिनाचे इंधन बडोद्यातून सयाजीरावांनी पुरविले होते. हा इतिहास दैदीप्यमान आहे. फक्त त्याचे 'जोडलेले' (Connected) पुनर्वाचन ही आपली आजची गरज आहे.
 केळुसकर गुरुजींना कुणबी-मराठा असूनही शालेय जीवनापासून आलेले जातीय अपमानाचे अनुभव फारच वेदनादायी आहेत. केळुसकरांनी ज्ञान व्यवस्थेच्या क्षेत्रात हस्तक्षेप केला हे जरी खरे असले तरी त्यांनी संस्कृत पारंगत होऊन हिंदू

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५१