पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वादाचा होता. महत्त्वाचे म्हणजे परंपरावादी शाहूंचे पुरोगामी शाहूंमध्ये क्रांतिकारक परिवर्तन याच कालखंडात सुरू झा होते. १९०९ ला शिक्षण अर्धवट सोडून ते कोल्हापुरातून बाहेर पडले. कोल्हापुरातील वास्तव्यात भाऊराव काही काळ शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहिले होते. या सर्व कालखंडात शाहू महाराजांमधील दिलदार माणूस त्यांनी अनुभवला होता.
सयाजीरावांची प्रेरणा
 १९०२ पासून भास्करराव जाधव व गणपतराव वकील यांच्या 'दीनबंधू' वर्तमानपत्राच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटलांवर पडत होता. १९०६ मध्ये अस्पृश्यता उद्धारासंदर्भातील सयाजीराव महाराजांच्या वाचलेल्या भाषणाचा प्रभाव कर्मवीरांची प्रेरणा होती. १९०८ मध्ये कोल्हापुरातील मिस क्लार्क वसतिगृहाचे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी मांडलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनविषयक विचारांनीसुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या भावी कार्याला विधायक दिशा दिली.
शाहू छत्रपती बोर्डिंग हाऊसला भेट

 भाऊराव पाटलांनी साताऱ्यात स्थापन केलेल्या छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला सयाजीरावांनी ४ एप्रिल १९३३ रोजी भेट दिली. यावेळी भाऊराव पाटील यांनी श्रीमंतांचे स्वागत केले. नंतर आम्रवृक्षांच्या छायेखाली खुल्या पटांगणात तयार केलेल्या

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ८