पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत, हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. यावरून काय सिद्ध होते तर हे की, या हीन मानलेल्या लोकांना जर संधी मिळाली तर ते इतर पांढरपेशा लोकांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नाहीत हे होय. "
 "येथे आम्ही विद्यार्थ्यास स्वाभिमानी होण्यास शिकवितो. आम्ही याचना करीत नाही व त्यांना याचना करण्यास शिकवीत नाही. दान देण्यास हात वर ठेवा, पण ते घेण्यास हात पसरू नका असे आम्ही त्यांना सांगतो आणि म्हणूनच कष्ट सोसण्यास ते उद्युक्त होतात. या संस्थेतून ते स्वाभिमानी, कार्यक्षम व उदारमतवादी नागरिक बनून बाहेर पडतील असे ध्येय आम्ही ठेवले आहे."

 " श्रीमंत सरकार महाराजसाहेब गेल्या डिसेंबर १९३२ च्या पाचव्या तारखेस व्हिक्टोरिया बोटीने मुंबई बंदरी बॅलाई पियरवर जेव्हा उतरले तेव्हा मी श्रीमंतांना तेथे भेटलो. ही माझी भेट ९ वर्षांनी झाली तरी श्रीमंतांनी मला ताबडतोब ओळखून 'काय भाऊराव, दाढी का व केव्हापासून वाढविली' असे विचारले. त्यावेळी त्या प्रश्नाचा जबाब मी दिला नाही. मी माझी जेव्हा एका कारखान्यांतील नोकरी काही कारणांनी सोडली तेव्हा मी अशी प्रतिज्ञा केली की, त्या कारखान्यांतील सर्व जागा या संस्थेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत पटकावल्या नाहीत तोपर्यंत मी केसास हात लावणार नाही. महाराज, दाढी वाढविण्याचे हे कारण मी आपणापुढे जाहीर करतो."

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १२