पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिक मदत मागितली नाही. परंतु मी त्यांना सांगितले की, महाराज मला आपल्या पदरी असलेले निवडक पहिलवान द्या. मी त्यांच्या कुस्त्या सर्व हिंदुस्थानभर करून त्यांतून खर्च वजा जाता जे निव्वळ उत्पन्न राहील ते या संस्थेकडे वापरीन. तेव्हा ते म्हणाले की, माझ्या पैलवानाचे पोषण अशा तऱ्हेने करण्याची मागणी करणारा तू एकटाच मला भेटलास.”

 “या संस्थेमध्ये हल्ली शंभर मुले आहेत. त्यापैकी पन्नास अस्पृश्य व बाकी स्पृश्य आहेत. दरेक मुलांस मासिक खर्च पाच रुपये येतो, त्यापैकी स्वतःच्या कष्टाने दरेक जण दीड रुपया कमावतो व निव्वळ बाकी खर्च फक्त साडेतीन रुपये येतो. दरेक विद्यार्थी आळीपाळीने भांडी घासणे, स्वयंपाक करणे, शेण काढणे, झाडलोट करणे, बागेमध्ये काम करणे इत्यादी कामे करतो. ही कामे करवून घेण्याचा हेतू हा आहे की, अशा प्रकारची कामे हे हीनपणाचे न समजता सन्माननीय समजले पाहिजे व तो ठसा मनावर उमटून दरेकास dignity of labour (काबाडकष्टाची प्रभुता) बरोबर समजावी हा होय. आठ महिने सर्व मुले आम्रवृक्षाच्या छायेखालीच निजणे-बसणे करतात. म्हणजे उघड्या हवेमध्येच राहतात व पावसाळ्याचे फक्त चार महिनेच येथे असलेल्या झोपड्यांचा आश्रय घेतात. या शाळेतील महार वगैरे पुष्कळ विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या शिक्षणसंस्थांमध्ये संस्कृत सारख्या गहन विषयांमध्येदेखील पारितोषिके पटकाविली

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ११