पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरुवातीला कारखान्याकडे ३,२७२ टन सिमेंटचा राखीव साठा होता. या वर्षी कारखान्यातील सिमेंटचे उत्पादन आणि विक्री अनुक्रमे ५७,०३१ टन व ५६,४२९ टन इतकी होती. दरवर्षी कारखान्यातील सिमेंट उत्पादनात वाढ होत गेली. या ५ वर्षाच्या कालावधीत सिमेंटच्या राखीव साठ्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे लक्षात येते. सिमेंट उत्पादन ४७,४३० टनावरून ८५,२६१ टन इतके वाढले. संस्थानातील सिमेंटचा वापर जवळपास दुप्पट झाल्याचे ५ वर्षाच्या आकडेवारीवरून लक्षात येते.
डायमंड ज्युबिली पीपल्स फंड

 सयाजीरावांच्या राज्यकारभाराच्या हीरकमहोत्सवप्रसंगी १९३६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'हीरकमहोत्सवी ट्रस्टने ' asोद्याच्या कृषी औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले. यावेळी डायमंड ज्युबिली पीपल्स फंडाची स्थापना उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून झाली. स्थापना वर्षी लोकसहभागातून ७ लाख रु. इतका निधी जमा करण्यात आला. या रकमेच्या व्याजातून वर्षाला २५ हजार रु. उत्पन्न मिळत असे. त्यातून शेती व शेतीपूरक व्यवसायांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यात येत होते. यातील ठरावीक रक्कम बाजूला काढून त्यातून खादी उत्पादक संस्थांना साहाय्य दिले जात होते. १९४०-४१ मध्ये एकूण १६ संस्थांना १,७५१ रु. मदत देण्यात आली. याच वर्षी १३८ शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आणि

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४४