पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्यासाठी ३,९९३ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. ३० शेतकऱ्यांना संस्थानच्या प्रायोगिक शेतीकेंद्रांवर भेटीला नेऊन त्यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण दिले. ४४ विद्यार्थ्यांना ३,६७२ कुटीर उद्योग शिष्यवृत्ती देण्यात आली.
डायमंड ज्युबिली पीपल्स व्हिलेज अपलिफ्टमेंट फंड
 १९३६ मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्याधिकार हीरकमहोत्सवानिमित्त या फंडाची स्थापना करण्यात आली. स्थापनावर्षी ६ लाख ५८ हजार ९८६ रु. इतका निधी लोकसहभागातून संकलित झाला. या निधीसाठीच्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष बडोदा संस्थानचे दिवाण होते. या समितीत संस्थानातील १ अधिकारी व ३९ सर्वसाधारण सदस्य होते. समितीने खेड्यांच्या मदतीसाठीचा दशवार्षिक कार्यक्रम तयार केला. त्यासाठी लोकसंख्येच्या निकषवार दहा विभागात संस्थानातील खेड्यांचे वर्गीकरण करण्यात आले. रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, विहिरी इ. साठी हा निधी ग्रामपंचायतींना देण्यात येत होता. या फंडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योगांच्या विकासाला गती आली.
हीरकमहोत्सवी कुटिरोद्योग संस्था

 बडोदा संस्थानातील कुटिरोद्योगांचा विकास करण्याच्या उद्देशाने १९३६ मध्ये ‘हीरकमहोत्सवी कुटिरोद्योग संस्थेची ' स्थापना करण्यात आली. या संस्थेद्वारे बडोद्यातील कारागिरांना

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४५