पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आर्यन वर्क्स विविध प्रकारची कृषी उपकरणे, लोखंडी पाईप, पाईप लाईनसाठी वापरले जाणारे व्हॉल्व्ह, रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, वस्त्रोद्योगांसाठी लागणारे ब्लिचिंग यंत्रे इ. तयार करत असे. तर बडोदा बोर्ड अँड इंजिनिअरिंग वर्क्समध्ये विविध प्रकारचे नट व बोल्ट तयार होत होते. याव्यतिरिक्त जी.बी.एस रेल्वे वर्क्समध्ये ड्रिलिंग मशीन, निर्जंतुकीकरण करण्याची यंत्र आणि अशाप्रकारच्या इतर वस्तूंचे उत्पादन या ठिकाणी घेतले जात होते.
सिमेंट उद्योग
 संस्थानाची सिमेंटची गरज भागवण्यासाठी द्वारका येथे सिमेंट कारखान्याची निर्मिती केली गेली. हा कारखाना नंतरच्या काळात ओखा सिमेंट कंपनी म्हणून ओळखला जाऊ लागला. या कारखान्यात उत्पादित झालेले सिमेंट शासकीय विभागांमध्ये मुख्यतः वापरले जात होते. १९३२ ते १९३७ या काळातील या सिमेंट कारखान्यातील सिमेंटचे उत्पादन व विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली. दरवर्षी या कारखान्यातील सिमेंटच्या राखीव साठ्यामध्ये झालेली वाढच त्याचे यश अधोरेखित करते.

 १९३२-३३ मध्ये ओखा सिमेंट कारखान्यामध्ये एकूण ४७,४३० टन सिमेंटचे उत्पादन करण्यात आले. आधीच्या वर्षातील राखीव साठ्यामुळे उत्पादनापेक्षा अधिक ४९,२१९ टन इतकी सिमेंट विक्री शक्य झाली. १९३३-३४ या वर्षाच्या

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४३