पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्यामुळे ६७,०७८ बॉक्स इतकेच काडीपेटीचे उत्पादन होऊन देखील ८०,६०७ बॉक्सची विक्री शक्य झाली. १९३५-३६ मध्ये हेच प्रमाण ३९,९५० बॉक्स काडीपेटीचे उत्पादन आणि ४९,९०० बॉक्सची विक्री असे होते.
काच उद्योग
 सयाजीरावांनी काच उद्योग उभारणीपूर्वी काच उत्पादनासाठी आवश्यक वाळूचे परदेशातून परीक्षण करून घेतले. या परीक्षणात वाळूची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतरच काच उद्योगांच्या उभारणीला मान्यता देण्यात आली. अलेम्बिक काच कारखान्यात दर महिन्याला विविध आकारच्या अडीच लाख बाटल्यांचे उत्पादन होत असे. या कारखान्याला अमेरिकेकडून काचेच्या बाटत्यांच्याच्या उत्पादनाकरिता स्वयंचलित यंत्रे मिळाली. या स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने काचेच्या बाटल्यांचे उत्पादन केले गेले. बडोदा येथील ब्रिटिश क्रिस्टल ग्लास वर्कमध्ये सर्व प्रकारच्या काचेच्या वस्तूंचे उत्पादन घेतले जाई.
श्री सयाजी आयर्न वर्क्स

लोह उद्योगांमध्ये सयाजी आर्यन वर्क्स आणि बडोदा बोल्ट अँड इंजिनिअरिंग वर्क्स या दोन प्रमुख संस्था होत्या. श्री सयाजी आयर्न वर्क्सची १९९४ मध्ये बडोद्यात सुरुवात झाली. हा कारखाना कृषी अवजाराच्या निर्मितीत अग्रेसर होता. सयाजी

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४२