पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विटांचा कारखाना
 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी १८९० मध्ये बडोदा सरकारकडून विटांचा कारखाना सुरू करण्यात आला. हा कारखाना उभा करण्यासाठी बडोदा सरकारकडून २४ हजार ७२२ रुपये खर्च करण्यात आले. या कारखान्यांमध्ये विटांबरोबरच पाईप व जार उत्पादनदेखील सुरू करण्यात आले. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली. विटांच्या उत्पादनाबरोबरच अन्य काही वस्तूंच्या उत्पादनासाठी विविध प्रयोग या कारखान्यात करण्यात आले.
काडीपेटीचा कारखाना

 १९२४ मध्ये बडोद्यात जंगली लाकडापासून काडीपेटी तयार करण्यासाठीचे प्रयोग यशस्वी झाले. प्रयोगाच्या यशस्वितेनंतर asोदा येथे महाराजा काडीपेटी कारखाना, पेटलाड येथे दातार काडीपेटी कारखाना आणि बिलीमोरा येथे अनंत काडीपेटी कारखाना अशा तीन कारखान्यांची स्थापना करण्यात आली. asोदा येथील महाराजा काडीपेटी कारखान्यामध्ये १९३१-३२ या आर्थिक वर्षात १६०० बॉक्स काडीपेटीचे उत्पादन करण्यात आले. यापैकी १३०० बॉक्स काडीपेटीची विक्री झाली. १९३२- ३३ मध्ये काडीपेटीचे उत्पादन व विक्री अनुक्रमे ९५,७५६ बॉक्स व ८६,४७९ बॉक्स इतके वाढले. १९३३-३४ च्या सुरुवातीला कारखान्यांमध्ये १८,५७९ बॉक्स इतका राखीव साठा होता.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४१