पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पश्चिम किनाऱ्याची त्याने पाहणी केली. बडोद्यातील ओखाबंदर आणि द्वारका यांच्या मध्यभागी मिठापूर हे ठिकाण निश्चित केले. या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यासाठी त्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेणे गरजेचे वाटले.
 १९३७ मध्ये सयाजीरावांना तो तरुण भेटला व त्याने नम्रपणाने सांगितले की, “भारताला मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण करावयाचे असेल तर रसायन उद्योगाची भक्कम पायांवर उभारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कापड, काच, कागद व साबणाच्या उत्पादनासाठी आणि दारूगोळ्याच्या कारखान्यांसाठी लागणारा कॉस्टिक सोडा व इतर सोडा मिश्रित रसायने यासाठी भारताला संपूर्णपणे परकीयांवर अवलंबून राहावे लागते. अल्कलीजचा उद्योग म्हणजे रसायन उद्योगाची गुंतागुंतीची व गोपनीय शाखा मानली जाते. सोडा ॲश बनवण्याच्या कृतीचे रहस्य एक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या समूहाने अत्यंत गुप्त ठेवले आहे. म्हणून मिठापूर येथे रसायन उद्योग सुरू करावा असे मला वाटते."

 सयाजीरावांना त्याचे म्हणणे पटले व त्या संदर्भात एखादी योजना आखण्यासाठी रतनजी टाटा व दोराबजी टाटा या बंधूंना पत्र लिहिले त्यात त्यांनी लिहिले होते 'मिठापूर येथे रसायन उद्योग स्थापन करावा अशी कपिलराम या तरुण इंजिनिअरची कल्पना आहे, त्यासाठी तुम्ही एखादी योजना तयार करावी आणि

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३५