पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



टाटांना उद्योग निर्मितीस पाठबळ
 आज भारतात प्रतिष्ठित मानला गेलेला टाटांचा पोलाद आणि केमिकल उद्योग हा सयाजीरावांच्या बडोदा संस्थानात विकसित झाला. जमशेटजी टाटा बडोदा संस्थानात सुरू करत असलेल्या 'टाटा आयर्न अँड स्टील' साठी इंग्रज त्रास देत होते. तेव्हा सयाजीराव महाराज टाटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक वेळा आपले वजन इंग्रजांजवळ खर्ची घातले होते. महाराजांना परदेश प्रवासातून व्यापार-उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेलचे महत्त्व लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी टाटांना असे हॉटेल स्थापन करण्याची कल्पना दिली. तसेच आर्थिक मदत देऊ केली आणि त्यातून जमशेदजी टाटा यांनी १९०४ मध्ये मुंबईत 'ताज' हे पंचतारांकित हॉटेल सुरू केले. सयाजीराव महाराजांनी १९०५ मध्ये टाटा स्मारक फंडाला २,००० रु. ची आर्थिक मदत केली होती. ही रक्कम आजच्या रुपयात ४९ लाखांहून अधिक भरते.

 बडोद्यातील काही उद्योग तर फारच अद्भुतरीत्या जन्माला आले. ज्या उद्योगांमुळे भविष्यात बडोदा संस्थानाला विशेष नावलौकिक मिळाला होता. या संदर्भातील एक उदाहरण विस्ताराने पुढे दिले आहे. कपिलाराम वकील नावाचा गुजराती तरुण इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याने सागरी खनिज संपत्तीचे उत्पादन करावयाचे ठरवले. यासाठी प्रथम भारताच्या

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३४