पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



औद्योगिक सल्लागार समिती आणि त्याची घटना
 लोकांना योग्य मार्गाने राज्याच्या संसाधनांचा विकास करण्याच्या कामात सहभागी होण्यासाठी, १९९४ मध्ये सयाजीरावांनी एक औद्योगिक सल्लागार समिती नेमली. समितीत ३२ सदस्यांचा समावेश होता. सल्लागार समितीचे मुख्य कार्य म्हणजे उद्योग, शेती आणि वन या दोन्ही बाबतीत स्थानिक गरजांचा अभ्यास करणे आणि आर्थिक विकासासंदर्भात विभागाला सल्ला देणे.
विकास मंडळ
 विकास मंडळाची स्थापना १९२९ मध्ये झाली. यानंतर विकासाच्या दृष्टीने सरकारच्या सक्रिय कामकाजाची सुरुवात झाली. या मंडळाचे कार्य मुख्यतः सल्लागाराचे होते. विकास विभागांना त्यांच्या संबंधित कामाचे कार्यक्रम तयार करण्यात मदत करणे आणि अशा प्रकारे राज्यातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षाच्या दिशेने या विभागांनी केलेल्या कामांचे समन्वय साधणे.
बडोदा आर्थिक संघटना

 १९३४ मध्ये बडोदा आर्थिक संघटनेची स्थापना केली. त्याला राज्यातील प्रमुख नेत्यांचा प्रतिसाद मिळाला आणि हळूहळू सदस्यांची संख्या १२० वर गेली. राज्याची आर्थिक समस्या हाताळण्याच्या उद्देशाने याची स्थापना केली गेली.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २९