पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अखत्यारित त्या विभागात स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली. १९०६ मध्ये, आर्थिक सल्लागार कार्यालय तयार केले गेले आणि औद्योगिक अनुभव व आर्थिक मूलभूत गोष्टींचे अचूक ज्ञान असणाऱ्या व्हाइटनॅक या अमेरिकन अधिकाऱ्याचा आर्थिक सल्लागार म्हणून उपयोग केला. सन १९०७ मध्ये या विभागाचे वाणिज्य व उद्योग संचालक म्हणून रूपांतर झाले. १९०९ मध्ये हा विभाग महसूल खात्यापासून विभक्त झाला आणि त्याला दिवाणांतर्गत ठेवण्यात आले जेणेकरून उद्योग थेट प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतील. सन १९१५ मध्ये हा विभाग पुन्हा संयुक्त महसूल आयुक्तांच्या अधीन ठेवण्यात आला.
विभागाची कामे पुढीलप्रमाणे होती.
 १) औद्योगिक आणि व्यावसायिक परिस्थितीचा अभ्यास करणे.
 २) औद्योगिक प्रयोग करणे आणि यशस्वी प्रक्रियेचे प्रदर्शन देणे.
 ३) उत्पादक, व्यापारी आणि कारागीर यांना सल्ला देणे.
 ४) वाणिज्य व उद्योगावर परिणाम करणाऱ्या बाबींचा सरकारला सल्ला देणे.
 ५) व्यापार, वाणिज्य आणि उद्योगांच्या संघटनांमध्ये लोकांना मदत करणे.

 ६) सरकारकडून सूट देण्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी आणि शिफारस करणे.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २८