पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सयाजीरावांनी केली. त्याचबरोबर राज्यातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये चित्रकला आणि हस्तोद्योग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. कारागिरना जातींना या औद्योगिक शिक्षणाचा कमालीचा फायदा झाला. कलाभवनच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञानाला आधुनिक शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे बडोद्यातील उद्योग विकासाला चालना मिळाली.
औद्योगिक प्रशिक्षणासाठीचे अन्य प्रयत्न
 राज्यातील नैसर्गिक संसाधनांवर संशोधन करून त्यांची उपयुक्तता जनतेच्या समोर मांडणे आणि नवीन उद्योग उभारणीसाठी या संसाधनाचा उपयोग करून घेण्याचे महत्त्व सयाजीरावांनी ओळखले. व्यापार, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी सूचना कराव्यात या हेतूने सयाजीरावांनी दिवाण व इतर अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीच्या अहवालानुसार बडोदा सरकारने औद्योगिक व तंत्रशिक्षण रुजवण्यासाठी आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार पुढील ठिकाणी तंत्र प्रशिक्षणाची सुरुवात यानुसार करण्यात आली.
(१) जी. बी. एस. रेल्वे वर्कशॉप
(२) पेटलाड येथील जिल्हा औद्योगिक शाळा
(३) पाटण व अमरेली येथील जिल्हा औद्योगिक शाळा
(४) नवसारी येथील जे. एन. टाटा हुन्नरशाळा

(५) बडोदा येथील चिमणाबाई औद्योगिक गृह

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २०