पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कृषी रसायनशास्त्राचा आधार घेण्याचा सल्ला दिला होता. इतके अद्ययावत प्रयोग महाराज बडोदा संस्थानात करत होते. यावरून बडोदा संस्थान किती अग्रेसर होते याची कल्पना येते.
बडोद्याचे कलाभवन
 सयाजीरावांनी १८९० मध्ये टी. के. गज्जर यांच्या नेतृत्वाखाली उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी व त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान देणारी कलाभवन ही संस्था स्थापना केली. कलाभवनमध्ये यांत्रिक अभियांत्रिकी, रंगकाम व रासायनिक तंत्रज्ञान, विणकाम तंत्रज्ञान, कला, वास्तुकला विज्ञान व व्यापारविषयक तंत्रज्ञान या ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. येथे अस्पृश्य, कारागीर व आदिवासींना मोफत औद्योगिक शिक्षण शिष्यवृत्तीसह देण्याची व्यवस्था सयाजीरावांनी केली होती. तत्कालीन भारतातील बहुसंख्य तांत्रिक संस्थांमध्ये न आढळणाऱ्या सर्व सोयींनीयुक्त प्रयोगशाळा आणि वर्कशॉप्स हे बडोद्यातील कलाभवनचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

 याचबरोबर विविध तांत्रिक व वैज्ञानिक विषयांची पुस्तके गुजराथी भाषेत उपलब्ध व्हावीत यासाठी 'सयाजीज्ञानमंजूषा' ही ग्रंथमाला सुरू केली. या मालेतून शास्त्रीय ज्ञानावरील पायाभूत ग्रंथ देशी भाषेतून प्रकाशित करण्यात येते होते. कलाभवनच्या स्थापनेनंतर लगेचच ३ जिल्हा औद्योगिक शाळांची स्थापना

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १९