Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अमरेली येथील जिल्हा औद्योगिक शाळेमध्ये सुतारकाम, विणकाम व शिलाई कामाचे प्रशिक्षण दिले जात होते. पाटण येथील औद्योगिक शाळेत फिटिंग, टर्निंग (Turning ), वायरमन व सुतार कामाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. नवसारी येथील जे. एन. टाटा हुन्नर शाळेमध्ये यांत्रिक अभियांत्रिकी चित्रकला व विविध प्रकारची कपाटे बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. चिमणाबाई औद्योगिक गृह ही महिलांना उद्योगविषयक प्रशिक्षण देणारी बडोद्यातील महत्त्वाची संस्था होती. तेथे विविध हस्तकलांचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली होती. या संस्थांपैकी नवसारी येथील जे. एन. टाटा हुन्नर शाळा संस्थेला सरकारकडून अनुदान दिले जात होते. इतर सर्व संस्था बडोदा सरकारकडून चालविल्या जात. १८९४ मध्ये asोदा येथे औद्योगिक संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयामध्ये विज्ञान व कला असे दोन विभाग करण्यात आले. विज्ञान विभागात मुख्यतः भूशास्त्र व जीवशास्त्र या विषयांची सखोल माहिती देण्यावर भर देण्यात आला.

 बडोदा संस्थानात सयाजीरावांनी सर्व जनतेला शिक्षण उपलब्ध करून देत असताना कौशल्य आधारित व्यवसायांचे शिक्षण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. या कौशल्याधारित व्यवसायांचे शिक्षण देत असताना त्या व्यवसायाशी संबंधित सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष कामांमध्ये कसा उपयोग करता येईल याचे ज्ञान देण्यावर भर दिला. ग्रामीण कारागिरांना स्वस्त उत्पादन

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २१